Fri, Jul 03, 2020 03:26होमपेज › Satara › सातारमध्ये एका रात्रीत तब्बल ५२ कोरोनाग्रस्त वाढले; बाधित ४०० च्या उंबरठ्यावर!

सातारमध्ये एका रात्रीत तब्बल ५२ कोरोनाग्रस्त वाढले; बाधित ४०० च्या उंबरठ्यावर!

Last Updated: May 27 2020 8:24AM

संग्रहित छायाचित्रसातारा : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज प्राप्त झालेल्या अहवालावरून नविन ५२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सातारमध्ये कोरोना कहर केला आहे असेच म्हणावे लागेल. 

तसेच हे अहवाल विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या रूग्णांचे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. याचबरोबर वाई येथील एका ६७ वर्षीय कोरोना बाधित रुग्णासह जांभेकरवाडी (ता. पाटण)  येथील एका ७० वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.