Sat, Jan 23, 2021 08:07होमपेज › Satara › कस्तुरीं’साठी केक, चॉकलेट वर्कशॉप

कस्तुरीं’साठी केक, चॉकलेट वर्कशॉप

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 10:52PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

दै.‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी अनेक सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध प्रकारचे केक व चॉकलेटस् महिलांना घरच्या घरी बनवता यावेत यासाठी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून सभासदांसाठी कराड येथे ‘केक व चॉकलेट मेकिंग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाताळच्या सणाचे चॉकलेट आणि केकशी असणारे नाते अनोखे आहे. नाताळच्या निमित्ताने प्रियजनांना भेटवस्तू देण्याकरीता ड्रायफ्रुटस्, मिठाईबरोबरच विविध केक तसेच आकर्षक पॅकिंग केलेले चॉकलेटस्ची मागणीही सध्या वाढलेली आहे. यासाठीच या केक वर्कशॉपचे आयोजन केले आहे.  येथील ड्रीम्स क्लासेसच्या संचालिका तेजस्वीनी शहा हे प्रशिक्षण देणार आहेत. मायक्रोव्हेव शिवाय गॅसवर घरच्या घरी केक बनवायला प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले जाणार आहे. यामध्ये ड्रायफ्रुट केक, कप केक, मफिन्स आणि विशेष आकर्षण म्हणजे ‘डॉल केक’ डेकोरेशनसह शिकविला जाणार आहे. चॉकलेटस्मध्ये ख्रिसमस कॅडबरी, सांताक्लॉज चॉकलेटस्, बटरस्कॉच, चोकोज, डेअरी मिल्क असे विविध प्रकार घरच्या घरी बनवायला शिकवणार आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ महिलांनी घ्यावा. 
केक व चॉकलेटची रेसिपी प्रत्येक सभासदाला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 यांच्याशी संपर्क साधावा. 

स्थळ : नगरपालिका शाळा नं. 3, दिनांक व वेळ : शनिवार, 23 डिसेंबर 2017 दुपारी 1.30 ते 5. कस्तुरी क्लब ओळखपत्र आवश्यक.

नावनोंदणीसाठी 50 रूपये व इतर महिलांसाठी 200 शुल्क

प्रशिक्षणासाठी कस्तुरी क्लब सभासदांना नाममात्र 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच कस्तुरी सभासद नसलेल्या महिलांसाठी 200 रुपये शुल्क भरावे लागेल. कार्यक्रमस्थळी कस्तुरी क्लबची सभासद नावनोंदणीची सोय करण्यात आली आहे.