Mon, Jul 13, 2020 23:06होमपेज › Satara › खटावमधील 16, तर माणमधील 35 गावांच्या पाणी प्रश्‍नावर तोडगा

खटावमधील 16, तर माणमधील 35 गावांच्या पाणी प्रश्‍नावर तोडगा

Published On: Jul 25 2019 1:51AM | Last Updated: Jul 24 2019 10:54PM
म्हसवड : प्रतिनिधी

माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खटाव तालुक्यातील 16 गावांना नेर धरणातून दरुज दर जाई तलावातून 27 एमसीएफटी पाणी तर माण तालुक्यातील 35 गावांना आंधळी धरणातून 60 एमसीएफटी पाणी देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत झाला. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन व पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली. दरम्यान  माण-खटाव तालुका टँकर व चारा छावणी मुक्‍तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री, जलसंपदा राज्यमंंत्री विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी माजी आ.डॉ. दिलीप येळगावकर, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाभाऊ खाडे, माजी आ. प्रभाकर घार्गे, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजित देशमुख, डॉ. संदीप पोळ, बाळासाहेब सावंत यांच्यासह  कृष्णा खोरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खलिल अन्सारी, जलसंपदाचे अधिकक्ष अभियंता विजय घोगरे, टेंभूचे अभियंता गुणाले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे व राज्य शासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री महाजन व मंत्री शिवतारे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये माण व खटाव तालुक्यातील टँकरग्रस्त व छावणीग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये खटाव तालुक्यातील एनकुळ, खातवळ, येलमारवाडी, जांबेवाडी, बांबवडे, तडावळेसह 16 गावांना नेर धरणातून दरुजदरदाई तलावातून 27 एमसीएफटी पाणी तर माण तालुक्यातील उत्तर भागातील मार्डी, शिंगणापूर, बिजवडीसह 35 गावांना आंधळी धरणातून 60 एमसीएफटी पाणी झाशी राणंद साठवण्याच्या निर्णयास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच माण व खटाव तालुक्यातील गावांना टेंभूमधून शेतीसाठी पाणी देण्यासाठी सुध्दा सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय झाला.