Fri, Sep 18, 2020 19:10होमपेज › Satara › व्हायरल : आता नवीन ऋतू ‘हिवसाळा’

व्हायरल : आता नवीन ऋतू ‘हिवसाळा’

Published On: Dec 06 2017 9:03PM | Last Updated: Dec 06 2017 9:03PM

बुकमार्क करा

सोशल मीडियामुळे तरुणाईच्या क्रिएटिव्हीटीला  प्रोत्साहन मिळू लागलं. ‘जो न देखे रवी, तो देखे कवी. जो न देखे कवी, ते देखे अनुभवी’, अशी एक आपल्याकडे  प्रचलित काव्यपंक्ती आहे. सोशल मीडियातल्या क्रिएटिव्ह कॅम्पस वर्ल्डने थेट त्यालाच चॅलेंज केले आहे. दररोज नव्याशी नाते सांगणारी तरुणाई सोशल मीडियावरील  मिळालेल्या हक्काच्या स्पेसमध्ये नव्या गोष्टींचा शोध तर घेतेच, पण आपल्या तारुण्यातल्या बिनधास्त गप्पादेखील झोडते. या गप्पांतून कधी हास्याचा तुषार उडतो, तर कधी समोरच्या व्यक्तीची टरदेखील उडवली जाते. सोशल मीडियावरील चर्चेचे विषय हे दररोज बदलत असतात, चलती का नाम गाडी म्हणत चर्चेतले विषय हाताळले जातात. आता पहा ना हिवाळ्यात पडत असलेल्या पावसाची व्हॉटसअ‍ॅपवर कशी खिल्ली उडवली जातेय. जनजीवनावर विपरित परिणाम करणार्‍या या पावसाची फेसबुक आणि व्हॉटस्अपवरही धम्माल सुरु आहे.अवेळी आलेल्या या पावसाची अगदी गमतीशीरपणे खिल्ली उडवली गेलीय. ही धम्माल सोशल मीडियाच्याच शब्दात...

प्रिय पाऊस ...
परत एकदा
वांदे नको लाऊस..
काय ते एकदाच सांग..
स्वेटर घालू...की रेनकोट.

पावासाळे मे ऊन पड्या...
उन्हाळे मे गारा...
अभी थंडी मे पड रहा है पाऊस...
देवा तुम्हारे कॉम्प्युटरका 
बिघड्या  क्या माऊस...?

Happy Mansoon
काही अपरिहार्य कारणास्तव 
तथा तांत्रिक बिघाडामुळे
ऐन डिसेंबरमध्ये थंडीऐवजी पावसाळा
नव्हे तर हिवसाळा सुरू करण्यात येत आहे....
इंद्र देव 

मी काय म्हणतो...
यंदा विधीमंडळाच्या अधिवेशनाला 
हिवाळी म्हणणार, पावसाळी की हिवसाळी?

शाळेतल्या मुलांना आणि
सरकारी कामगारांना
सुट्टी देताय... 
मग आम्ही  प्रायवेटवाले
काय सुपरमॅन आहोत ?

अशोक सराफ यांनी ओखी चक्रीवादळाबाबत 
पूर्वीच भविष्यवाणी केली होती... (धुमधडाका)
.
.
विख्खी.., व्याख्ख्या..., ओख्खी...

पुन्हा पावसाळा आला
आता दिवाळी येणार.. परत बोनस.
होय हे माझ सरकार...  आम्ही लाभार्थी...

आम्ही शाळेत असताना ही वादळं
कुठे मेलेली काय माहीत ....

गंभीर प्रश्‍न
सांताक्लॉज येणार आहे की गणपती?

आता नवीन ऋतु
हिवसाळा...

कुणाला  पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर टाकून घ्या पटकन...
पाऊस आलाय परत

मेरा देश बदल रहा है ..
थंडी मे पाऊस पड रहा है... 


आमच्याकडे स्वेटरला प्लास्टिक लावून मिळेल...
(पुणेरी पाटी)

अशा कितीतरी काव्यमय चुटक्यांनी व्हॉटसअपवर  दाणादाण उडवून दिली आहे. हे ओखी वादळ व्हॉटसअ‍ॅपवर चांगलंच घोंगावलं आहे.  काही काव्य करमणूक करणारी असली तरी काही चुटक्यांनी शेतकर्‍यांचे अश्रू पुसणारी भावनिकता तर काहींनी माणसाबरोबर बदललेल्या वातावरणाचीही अगतिकता व्यक्त केली आहे. अनेकांच्या याविषयावरील चारोळ्या तर हृदयस्पर्शी ठरल्या आहेत.

- संजीव कदम