होमपेज › Satara › पाटणचा विकास कराडला जाऊन सांगण्याची वेळ का आली? सत्यजितसिंह 

पाटणचा विकास कराडला जाऊन सांगण्याची वेळ का आली? सत्यजितसिंह 

Published On: Dec 09 2018 1:36AM | Last Updated: Dec 09 2018 1:36AM
पाटण : प्रतिनिधी

ढेबेवाडीत जाऊन कोयनेचा तर तारळ्यात जावून कुंभारगावच्या विकासाचे दाखले देणार्‍या आ. शंभूराज देसाई यांना पाटण तालुक्यात केलेला विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का आली? येथील लोकांना आ. देसाई यांच्या भुलथापा व विकासाच्या गप्पा माहीत असल्याने आपले पितळ उघडे पडेल याची भीती त्यांना वाटत होती की काय, असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केला आहे. 

प्रसिध्दी पत्रकात पाटणकर यांनी म्हटले आहे की, आ. देसाई तुम्ही फक्त भुलथापा देण्यात पटाईत आहात. एका भागात जाऊन दुसर्‍या भागात कसा कोट्यवधीचा विकास केला याची भाषणे द्यायची. सातत्याने एकच गोष्ट सांगितल्याने ती कधी तरी खरी वाटते या ग्लोबेल्स नितीचा तुमचा विचार असला तरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी तुमचा फसवा बुरखा फाडून टाकला आहे. विजय झाला की स्वकर्तृत्व आणि पराभव झाला की धनशक्ती ही तुमची कायमचीच टिमकी आहे.   पाटण तालुक्यात चालूवर्षी जास्त पाऊस झाला त्यामुळे पिके कुजली, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्या काळात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता मात्र तो झाला नाही हे दुर्दैव.  विधिमंडळात तुम्ही किती आवाज उठवला हे जगजाहीर आहेच. पुरवणी यादीत चार विभागांचा समावेश करून स्वतःची पाठ थोपटून घेणे म्हणजे तुमचे कर्तृत्व याला तालुक्याचे आमदार म्हणायचे का विभागाचा नेता हे एकदा स्पष्ट करा, असेही आवाहन त्यांनी केले.