होमपेज › Satara › सातारा : नागेवाडीतील महिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video)

सातारा : नागेवाडीतील महिलांचा दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा (video)

Last Updated: Jan 15 2020 9:57AM
लिंब : वार्ताहर

नागेवाडी (ता. सातारा) येथे बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याच्या घरावर गावातील महिलांनी मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी दारू विक्री विरोधी दारूच्या बाटल्या फोडत दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली.

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नागेवाडी गावातील अनेक  ग्रामस्थ दारूच्या आहारी गेल्याने देशी दारूचा धंदा बोकाळला होता. त्यातच दारूच्या आहारी गेल्याने गावातील अनेक जण मृत्युमुखी पावले आहेत. त्यातच गावातील एकाच घरातील तब्बल पाच जण दारूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या दारू व्यवसायाच्या विरोधात गावातील शंभरहून अधिक महिलांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी गावातील युवकही मोठ्यासंख्येने उपस्थित होते.