Wed, Aug 12, 2020 20:02होमपेज › Satara › 'जाणता राजा'वरून दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केला खुलासा! (video)

'जाणता राजा'वरून दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केला खुलासा! (video)

Last Updated: Jan 15 2020 4:44PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसातारा : पुढारी ऑनलाईन

भाजपच्या दिल्ली कार्यालयात आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर चांगलेच रणकंदन  माजले आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुस्तकावर झालेल्या वादावरून स्पष्टीकरण दिले. मात्र ते देत असताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी जाणता राजावरून राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. हे विशेषण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वापरले जाते.

अधिक वाचा : एका चुटकीत 'या' अ‍ॅपमधून करा 'पीएफ'ची कामे!

यानंतर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले  आहे. ते म्हणाले, की मी कुठेही म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला आहे. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. 

अधिक वाचा : उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत; राऊतांचे आव्हान

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन पुस्तक वादाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतंच प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यावरून वादंग उठला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी स्पष्ट भुमिका जाहीर करावी आणि भाजपतून राजीनामे देण्याची मागणीही राऊतांनी केली होती. यावर बोलताना उदयनराजेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले आहेत.

अधिक वाचा : जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे. या मुद्यावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा प्रश्न अनेकदा पडतो, असेही ते म्हणाले. काल जे पुस्तक प्रकाशित झालं, ते ऐकून अत्यंत वाईट वाटलं. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अधिक वाचा : कुठे शिवाजी राजे व कुठे 'हे' सर्व हवशे नवशे गवशे : शिवसेना