Thu, Jul 02, 2020 12:08होमपेज › Satara › आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले खा. शरद पवार यांचे सारथ्य

खा. उदयनराजे बसले आ. शिवेंद्रराजे यांच्या गाडीत(Video)

Published On: Jan 26 2019 3:41PM | Last Updated: Jan 26 2019 4:01PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजांचे मनोमिलन तुटले. तेव्हापासून दोघांमध्येही बेबनाव आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे हे आमदार शिवेंद्रराजे यांच्याशी सलगी वाढवत असतानाचे पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील एका कार्यक्रमासाठी आलेले शरद पवार यांचे सारथ्य आ. शिवेंद्रराजे यांनी केले. आ. शिवेंद्रराजे यांच्या गाडीत चक्क खा. उदयनराजे बसले. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

साताऱ्यातील यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसच्या उद्घाटनासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे पोलिस परेड ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यावेळी खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे, आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केले. पवार कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघाले त्यावेळी शिवेंद्रराजे यांनी आपल्या गाडीतून चालकाला उतरविले. त्यांनी स्वतः गाडीची सूत्रे स्वीकारली. आ. शिवेंद्रराजे यांच्या बाजूला शरद पवार, मागे खा. उदयनराजे आणि त्यांच्या बाजूला आ. शशिकांत शिंदे अशा चार नेत्यांनी  कार्यक्रमस्थळापर्यंत एकत्रित प्रवास केला.  दोन्ही राजांमधील पराकोटीचा संघर्ष सातारकरांनी पाहिला आहे. खा. उदयनराजे यांना आ. शिवेंद्रराजे यांच्या गाडीत पाहून उपस्थित अचंबित झाले.