Wed, Jul 08, 2020 10:00



होमपेज › Satara › दिग्गज काय बोलणार उदयनराजेंवर? (video) 

दिग्गज काय बोलणार उदयनराजेंवर? (video) 

Published On: Feb 23 2018 4:24PM | Last Updated: Feb 23 2018 4:45PM



सातारा : प्रतिनिधी

खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या 51 वा वाढदिवस सातार्‍याच्या जिल्हा परिषद मैदानावर मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. या शाही सोहळ्याला राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. 

उदयनराजेंच्या वाढदिवसाला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. आयोजित कार्यक्रमात नेते उदयनराजेंवर काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.