Tue, Jun 15, 2021 13:10होमपेज › Satara › कराडः अवघ्या सात वर्षाच्या मुलाचा खून 

कराडः अवघ्या सात वर्षाच्या मुलाचा खून 

Published On: Aug 11 2019 2:03PM | Last Updated: Aug 11 2019 1:46PM
कराड : प्रतिनिधी 

कराडनजिक मलकापूरच्या हद्दीतील आगाशिवनगर झोपडपट्टीत सात वर्षाच्या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. काल (ता.१०) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

सासू व मेहुण्यावर असलेल्या रागातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी डीवायएसपी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी भेट दिली. रणजीत उर्फ निरंजन मुकेश पवार (वय 7, रा. आगाशिवनगर, दांगटवस्ती) असे खून झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सागर शंकर जाधव (रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतची फिर्याद अनिता मुकेश पवार यांनी शहर पोलिसात दिली.