Fri, Jul 03, 2020 16:37होमपेज › Satara › सातारा : पूरग्रस्त मोरेवाडीत पुढारीने पोहचवला माणुसकीचा टेम्पो

सातारा : पूरग्रस्त मोरेवाडीत पुढारीने पोहचवला माणुसकीचा टेम्पो

Published On: Aug 11 2019 10:50AM | Last Updated: Aug 11 2019 10:46AM

पुढारीने पोहचवला माणुसकीचा टेम्पोसातारा : प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे जमीन खचल्याने व पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरले आहे. तब्बल ८० कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यांना खाण्यासाठी अन्न, कपडे, पांघरूण नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही बाब सातारा पुढारीला समजल्यानंतर त्याबाबतची सत्यता पडताळून अवघ्या ३ तासात या पूर्ण गावाला मदत पोहोच करण्यात आली. 

दैनिक पुढारी सातारा कार्यालयात जिल्हावासियांनी माणुसकीची मदत म्हणून कपडे, पाणी व अन्नाचे भरभरून दान दिले. त्यातील माणुसकीचा एक टेम्पो टीम पुढारीने मोरेवाडीमध्ये शनिवारी दुपारी पोहोचवला. याठिकाणी ग्रामस्थांना मायेची ऊब म्हणून नवीन ८० ब्लँकेट, महिलांना सहावारी व नऊ वारी साड्या, पुरुषांना कपडे तसेच अन्न देण्यात आले. याचवेळी तहसिलदार आशा होळकर त्या ठिकाणी गाव पाहणीसाठी उपस्थित होत्या. 

मोरेवाडीमध्ये दैनिक पुढारीने राबवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतुक करत प्रशासना अगोदर जिल्हावासियांनी पुढारीच्या माध्यमातून केलेली मदत मोलाची असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा आदर्श सर्वांनी ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मोरेवाडीच्या आबाल वृद्धानी मदत करणाऱ्या सातारकरांचे आभार मानले.