Fri, Jul 10, 2020 15:54होमपेज › Satara › ...तर कराडही देशात प्रथम क्रमांकावर असेल

...तर कराडही देशात प्रथम क्रमांकावर असेल

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:13PMकराड : प्र्रतिभा राजे 

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात सलग दुसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळवणारी इंदोर महापालिकेने ज्या पध्दतीने अभ्यासपूर्ण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काम केले आहे. त्याचपध्दतीने कराड पालिकेनेही अभ्यासपूर्ण शहरामध्ये काम केले आहे. मात्र किमान पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी पालिकेला आणखी प्रयत्नांची गरज आहे.  यासाठी घंटागाड्या अपडेट करणे, कचरा डेपोमुक्‍त शहर करणे,प्रत्येक कामाचे संगणकीकरण करणे, सांडपाणी प्रक्रिया पूर्णक्षमतेने सुरू करणे आदींची गरज आहे. 

इंदोर महापालिकेने असणार्‍या कचरा गाड्या अपडेट आहेत. दररोज या गाड्यांची स्वच्छता केली जाते. प्रत्येक कचरा गाडी त्या त्या ठिकाणी पोहोचते की नाही याची तपासणी होते. कराडमध्ये सध्या 14 कचरा गाड्या आहेत. मात्र आता हा आकडा 22 पर्यंत आणण्यात यश आले असून दि. 15 ऑगस्ट रोजी या नवीन गाड्या कार्यरत होणार आहेत.  कचरा गोळा केल्यानंतर तो थेट कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. यासाठी इंदोरमध्येे विविध ठिकाणी कंपोस्ट पीठ करण्यात आले आहेत. कराडमध्ये प्रथम सध्याचा कचरा डेपो हलवावा लागणार आहे. नगरपालिकेला मंजूर असलेल्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मध्ये    20 हजार स्क्‍वेअर फूट शेड कचरा प्रक्रियेसाठी तयार करणे गरजेचे आहे. त्याबरोबर इंदोरमध्ये कचर्‍याचे वजन केले जाते. कराडमध्ये असा वजन काटा असणे गरजेचे आहे जेणेकरून त्या कचर्‍याचे रोजच्या रोज रेकॉर्ड होत जाईल, असे माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले. 

इंदोरमधील मल:निसारण केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यासाठी इंदोरमध्ये मोठ्या प्रमाणात जागेची उपलब्धता आहे. सुमारे 36 एकर जागेमध्ये हा प्लॅन उभा केला आहे. कराडमध्ये सध्या मल:निसारण केंद्र सुरू आहे मात्र पूर्ण क्षमतेने ते सुरू होणे गरजेचे आहे. तसेच ऑक्सिडेशन पॉण्डमध्ये जाणारे पाणी थांबणे गरजेचे आहे. व त्या जागेवर सुशोभिकरण करता येईल. त्यामुळे हिरवाई दिसून येईल. इंदोरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचे शुध्दीकरण करून बागांना पाणी घातले जाते. 

दररोजच्या कचर्‍याबरोबरच इंदोर महापलिकेने मंडईतून रोज निघणार्‍या ओल्या कचर्‍यावरही प्रक्रिया करून वाहनांना लागणारा गॅस निर्माण केला जातो. त्याचप्रमाणे कराड शहरामधील धार्मिक स्थळे तसेच गणेशोत्सव काळामध्ये नदीला जाणारे निर्माल्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. कराड पालिकेचे यासाठी असणारे प्रितीसंगम बागेतील कंपोस्ट पीठ आहे याव्यतिरिक्‍त याठिकाणी मशिन बसवणे गरजेचे आहे. यामुळे निर्माल्याची खत निर्मिती होवू शकेल. इंदोरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वच्छता राहण्यास मदत होते. कराडमध्ये विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे वाढवणे गरजेचे आहे. 

कराड पालिकेने कचर्‍यापासून खत निर्मिती करणे, वीजनिर्मिती करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया केली आहे. मात्र खत निर्मिती, संकलन याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. जर या काही बाबी केल्या गेल्या असत्या तर कराडने 2018— 2018 मध्ये पहिल्या दहामध्ये क्रमांक मिळवला असता. मात्र 2018— 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड शहर नक्‍कीच पहिल्या पाच क्रमांकामध्ये असेल. यासाठी आणखी थोड्या प्रयत्नांची गरज आहे.