Wed, Jul 08, 2020 11:19होमपेज › Satara › शरद पवार यांच्या समोरच शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांची बुकला-बुकली(video)

शरद पवार यांच्या समोरच शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांची बुकला-बुकली(video)

Published On: Feb 22 2019 2:51PM | Last Updated: Feb 22 2019 3:28PM
फलटण : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फलटण येथील बैठकीत माण-खटावचे राष्ट्रवादीचे युवा नेते शेखर गोरे यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर व शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी फलटण येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला शेखर गोरे यांनाही निमंत्रण होते. या बैठकीला शेखर गोरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेखर गोरे यांच्या समर्थकांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल चढवला. 

जनतेमध्ये बसलेल्या शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांनी कविता म्हेत्रे यांचे भाषण सुरू असताना गोंधळ घालायला सुरूवात केली. आमचा पराभव कुणी केला? याचे आधी उत्तर द्यायला सांगा अशी जोरदार मागणी या समर्थकांनी केली. शेखर गोरे व रामराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना जाऊन भिडले. या हाणामारीनंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र तरीही दोन्ही गटाचे कार्येकर्ते कुणीही कुणाचे ऐकत नव्हते. शेवटी पवार यांना स्वत: माईक हातात घ्यावा लागला. शेखर गोरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोरे यांचे कार्यकर्ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते.