Mon, Apr 06, 2020 08:08होमपेज › Satara › सातारा : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग 

सातारा : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग 

Last Updated: Mar 26 2020 6:03PM

महाबळेश्वर परिसरात पडलेला अवकाळी पाऊसजावळी (सातारा) : पुढारी ऑनलाईन

तालुक्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी पडलेल्या दहा मिनिटांच्या पावसानंतर काल गुढीपाडव्याच्या मुहुर्तादिवशीही दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना करत जावळी महाबळेश्वर परिसरात पुन्हा जोरदार बॅटींग चालू केली. तब्बल अर्धातास मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडाटासह जावळी तालुक्यातील हातगेघर, करहर, कुडाळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. या गारांच्या पडलेल्या पावसाने शेतामध्ये काढलेल्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ज्वारी व गहू पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच महाबळेश्वर परिसरामध्ये स्ट्रॉबेरीचे ही खूप नुकसान झाले आहे. हातगेघर परिसरामध्ये पडलेल्या गारांचा थर हा बर्फाच्छादित चादर असल्याचे दिसत होते. गाराचा पाऊस जावळी महाबळेश्वर व परिसरात पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केली आहे. काल रात्री बारा वाजल्यापासून पुन्हा २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आली आहे. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानात रेशन खरेदी व भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दीड वाजल्यापासून ढगाच्या कडकड्यासह परिसरात अर्धातास मुळधार पाऊस पडला. थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली व जोरदार वाऱ्यासह पुन्हा पावसाने सुरूवात केली. यामध्ये जावळी व महाबळेश्वर शहराचा विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. वारे एवढे मोठ्या प्रमाणात होते की रस्त्यावर जास्त प्रमाणात पाला पाचोळा पडलेला होता.