होमपेज › Satara › कराड येथे ‘लूक अँड लर्न सेमिनार’ला उदंड प्रतिसाद

कराड येथे ‘लूक अँड लर्न सेमिनार’ला उदंड प्रतिसाद

Last Updated: Dec 02 2019 1:48AM
कराड : प्रतिनिधी
दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आणि लावण्यसखी ब्युटी शॉपी यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या लूक अँड लर्न सेमिनार तसेच सौंदर्यशोभिका स्पर्धा वेणुताई चव्हाण सांस्कृतिक केंद्र येथे पार पडल्या.

पुढारी कस्तुरी क्‍लब मार्फत सौंदर्य क्षेत्रातील ब्युटीशियनचा स्तर उंचावण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये डॉ. अंजली जोशी यांचे मार्गदर्शन मेकअप संदर्भात लाभले. त्याचबरोबर के.डी.एस. नेल अ‍ॅकॅडमीच्या श्री. व सौ. वाझे यांनी नेल आर्टचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित सर्व ब्युटीशियनना अर्कया कॉस्मेटिक प्रा. लि. मुंबई यांच्याकडून गिफ्टस देण्यात आले.

सर्वात शेवटी सौंदर्यशोभिका स्पर्धा 2019 ही पार पडली. त्यात तीन विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक पूनम शिंदे (कराड), द्वितीय क्रमांक सज्जना हुताल (कोरेगाव), तृतीय क्रमांक दीपा लोहाना (सैदापूर), उत्तेजनार्थ लतिका शहा (गजानन सोसायटी). या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमीच्या जया कला या परीक्षक म्हणून लाभल्या. 

स्कीन संदर्भात अर्कया कॉस्मेटिकचे डायरेक्टर केदार गादीकर  यांनी मार्गदर्शन केले. लावण्यसखी ब्युटी पार्लरचे पंकज पवार आणि रुपाली पवार यांनी आभार मानले.