Sat, Jul 11, 2020 12:19होमपेज › Satara › सत्ता लोकांसाठी राबवा : उदयनराजे

सत्ता लोकांसाठी राबवा : उदयनराजे

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 04 2018 1:39AMसातारा : प्रतिनिधी

सत्ता लोकांसाठी राबवा, सत्तेचा उन्माद करु नका, जनता बरोबर असली तर आणि तरच लोकप्रतिनिधींना किंमत आहे, तुम्ही चांगलेच विकास कार्य ग्रामस्थांसाठी करणार यात आम्हाला शंका नाही, तुमच्या प्रत्येक कार्यातून नेहमी सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे, अशा शब्दात, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सदैव लोकांबरोबर रहा असा मार्मिक सल्‍ला दिला.

परळी खोर्‍यातील लुमणेखोल येथील ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या खा. श्री. छ. उदयनराजे गटाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकूभाऊ भोसले, उरमोडी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे  प्रमुख उपस्थित होते.

बबनराव देवरे म्हणाले, परळी खोर्‍यातील जनता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना मानणारी आहे. राज्य सरकारचे आधी धरण मग पूनर्वसन या धोरणात आधी पुनर्वसन आणि मग धरण अशी जाहीर भूमिका मांडून धरणग्रस्तांचे तारणहार असलेल्या खा. उदयनराजेंवर परळी खोर्‍यातील जनतेचा प्रचंड विश्‍वास आहे. त्यामुळेच येथून पुढील काळात, परळी खोर्‍यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली निरंतर विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देवरे यांनी दिली.

यावेळी आर. वाय. जाधवसर, लक्ष्मण गुजर, महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे, ग्रामस्थ मंडळ, लुमणेखोल, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव माने, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भंडारे, वसंतराव माने, सुरेंद्र भंडारे, हणमंतराव भिलारे, तुकाराम बा. माने, जयराम भंडारे, रविंद्र माने, मारुती भि.माने, बाबुराव भंडारे गुरुजी, मनोहर भंडारे, अरुण माने, प्रदिप शं. माने, विजय भंडारे, शंकर लाड, अशोक भंडारे, माजी सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जगन्नाथ माने यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कोंडवे पोटनिवडणुकीत खासदार गटाचे वर्चस्व

सातारा शहरालगत  असणार्‍या कोंडवे, संभाजीनगर, खिंडवाडी येथील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीत खा. उदयनराजे यांना मानणारे सदस्य मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. जावली तालुक्यातील बेलावडे येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतही सरपंचांसह सर्व सदस्य खा. उदयनराजे भोसले यांना मानणारे निवडून आलेले आहेत.