Sat, Mar 28, 2020 16:51होमपेज › Satara › सातारा : अतिक्रमण काढताना पोलिसांसमोरच एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले ( video)

सातारा : अतिक्रमण काढताना पोलिसांसमोरच एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले ( video)

Last Updated: Feb 20 2020 8:30PM

पोलिसांसमोरच एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले सातारा : पुढारी वृत्तसेवा
साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून नगर पालिका व पोलिसांकडून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे. गुरुवारी सकाळी एसटी स्टँड परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. यावेळी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. 

वाचा :शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत; उदयनराजेंचे ट्विट

संजय पवार असे त्यांचे नाव असून ते हॉकर संघटनेचे शहराध्यक्ष आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. सातारा शहरात अतिक्रमण वाढल्यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. 

वाचा :शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाले अन् सातारा थबकला