Tue, Aug 11, 2020 21:40होमपेज › Satara › दीपक पवारांचा जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा

दीपक पवारांचा जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा

Published On: Sep 21 2019 12:45PM | Last Updated: Sep 20 2019 11:57PM

संजीवराजे ना. निंबाळकर यांच्याकडे राजीनामा देताना दीपक पवारसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेचे जावली तालुक्यातील कुडाळ गटातून भाजपतर्फे कमळ चिन्?हावर निवडून आलेले जि. प. सदस्?य दीपक पवार यांनी आपल्?या सदस्?यत्?वाचा राजीनामा शुक्रवारी सायंकाळी जि. प. अध्?यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांच्?याकडे सुपूर्द केला. शरद पवारांच्?या दौर्‍याआधीच पवारांनी राजीनामा दिल्?याने भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेतील भाजपची सदस्य संख्याही कमी झाली आहे.

2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत  कुडाळ जि.प. गटातून दिपक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋषिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात आपला ठसा उमटवण्यास सुरूवात केली. विविध विकास कामांच्या माध्यमातू्न ते गावोगावी पोहोचले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून दीपक पवार इच्छूक होते. मात्र, ऐनवेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर सातारा -जावली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून गेली. गेली अनेक वर्षांपासून दीपक पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्याविरोधात चांगलीच मोट बांधली होती. मात्र, सातार्‍यात आलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी भाजपाकडून शिवेंद्रराजे यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे दिपक पवार यांचे समर्थक चांगलेच दुखावले गेले. 

समर्थकांनी मेळावा घेत दीपक पवार यांना राष्ट्रवादीत जाण्याचा आग्रह केला. त्यानंतर पवार यांनी खा. शरद पवार यांची भेट घेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे सूतोवाच दिले होते. राष्?ट्रवादीत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्?यासाठी पवार यांनी जिल्?हा परिषद सदस्?यत्?वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. पवारांच्?या या राजीनाम्?यामुळे मतदारसंघात राजकीय गणिते बदलणार आहेत. दरम्यान, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी हा राजीनामा स्वीकारून अधिक कार्यवाहीसाठी तो मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडे दिला आहे.