होमपेज › Satara › साताऱ्यात उदयनराजेंची 'हॅटट्रिक'

साताऱ्यात उदयनराजेंची 'हॅटट्रिक'

Published On: May 23 2019 8:33AM | Last Updated: May 23 2019 5:11PM
सातारा : पुढारी ऑनलाईन

सातारा लोकसभा मतदारसंघातील नवरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या खासदार उदयनराजे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. उदयनराजे यांनी आपली स्टायलिश कॉलर पुन्हा फडकली आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले होते, पण राजे सरस ठरले. 

सातारा लोकसभा मतदारसंघात लोकांनी मला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवले आहे. जिल्ह्यातील जनतेचा ,पत्रकारांचा मी आभारी असून हा लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी हार तुरे आणू नयेत, गुलाल उधळू नये, मिरवणुका काढू नयेत असे आवाहन उदयनराजे यांनी केले.