Thu, Jul 02, 2020 11:21होमपेज › Satara › आ. आनंदराव पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू 

आ.आनंदराव पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू 

Published On: Sep 12 2019 8:43PM | Last Updated: Sep 12 2019 10:31PM
कराड : प्रतिनिधी 

आमदार आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला रामराम करून भाजपमध्ये जाण्याबाबत मनोदय व्यक्त केल्यानंतर सध्या कराड दक्षिण काँग्रेसमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. दिनांक १३ सप्टेंबर रोजी आनंदराव पाटील यांनी त्यांच्या समर्थकांचा मेळावा स्थगित करण्याचा प्रयत्न सुरू असून आहे. आ. आनंदराव पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसमधून सुरू असून उद्या होणारा मेळावा स्थगित करावा, आपण चर्चा करून मार्ग काढू असा निरोप पाठवण्यात आला आहे. दरम्यान उद्या मेळावा होणारच असल्याचे आनंदराव पाटील यांच्या समर्थकांनी सांगितले .

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदार आनंदराव पाटील यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि आणि दुर्लक्षित करण्यामुळे पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दूर जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता. काँग्रेसमध्ये आपणास डावलण्यात येते. महत्त्वाच्या कार्यक्रमाचे निरोप दिले जात नाहीत. कार्यक्रमात बोलू दिलेत जात नाही. अशा प्रकारच्या वागण्याला कंटाळून आनंदराव पाटील यांनी हा निर्णय घेतला होता. याबाबत आपले मनोगत कार्तिक कार्यकर्त्यांसमोर मांडून पुढील निर्णय घेण्यासाठी दिनांक १३ सप्टेंबर रोजी पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात भविष्यातील दिशा जाहीर करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

आनंदराव पाटील यांच्या आ. चव्हाण यांना सोडून जाण्याच्या भूमिकेमुळे दोन दिवसापासून मोठे वादळ निर्माण झाले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा निष्ठावंत कार्यकर्ता, आमदार सोडून जाण्याच्या निर्णयामुळे पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का बसला होता. गेल्या दोन दिवसापासून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. दोन दिवसापासून पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना आराम करावा लागला. आज दुपारनंतर आनंदराव पाटील यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर कराड दक्षिण व उत्तर मधील अनेक कार्यकर्ते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मन मोकळे केले. दुसरीकडे कराड लगतच्या एका गावातील पदाधिकाऱ्यांनी आनंदराव पाटील यांच्याबाबत भावना व्यक्त करताना आ. आनंदराव पाटील आपल्यापासून लांब जाणे योग्य नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितले.

दरम्यान सदर व्यक्तीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण याबाबत चर्चा करू, आनंदराव नाना यांच्या मनात काय असेल त्यांचं ऐकून घेऊ, पक्षाला आता अडचणीचे दिवस असताना हे योग्य नाही, असे स्पष्ट करताना आनंदराव पाटील यांनी उद्या होणारा मेळावा स्थगित करावा, आपण चर्चेतून मार्ग काढू असा निरोप संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आनंदराव पाटील यांच्याकडे पाठवण्यात आले असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.