Wed, Aug 12, 2020 08:52होमपेज › Satara › पाचगणी नगराध्यक्षांसह स्वयंसेवकांनी केली सफाई

टेबल लँडवर स्वच्छतेचा जागर  

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 9:04PMपाचगणी : वार्ताहर 

सुप्रसिद्ध थंड हवेचे व निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाचगणी शहराची देशभर सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या नगरपालिकेत निवड झाली आहे. यामुळे शहरातील अबालवृद्ध शहराच्या स्वच्छतेसाठी झपाटून काम करू लागले आहेत. दरम्यान, पाचगणीचा केंद्रबिंदू असलेल्या टेबल लॅन्डवरही स्वच्छता स्वयंसेवक व स्टॉलधारकांच्या मदतीने टेबल लँडवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 

पाचगणी शहरात स्वच्छतेची चळवळ दिवसेंदिवस व्यापक होत असताना शहराच्या नंबर एक करिता वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक व कर्मचारी झपाट्याने काम करत असल्याचे दिसू लागले आहे. 

दरम्यान, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा मैस्कर यांनी नुकतीच पालिकेला भेट दिली होती. त्यांच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मुख्य रस्त्याच्या शेजारील शाळांना रंगकाम, अंतर्गत रस्त्याची डागडुजी, डांबरीकरण होवु लागल्याने स्वच्छतेचा फिव्हर आणखीनच वाढला असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नगराध्यक्षांची कृतीशील कामगिरी 

पाचगणीतील स्वच्छता चळवळीत कृतीशील सहभाग घेत नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनीही स्व:ता हातात झाडू घेऊन टेबललँडवर साफसफाई केली. पाचगणीत स्वच्छतेची चळवळ तीव्र होत असून अबालवृद्ध सामील झाल्याने पालिका नंबर येईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.