सातारा : यवतेश्वर घाटात बिबट्याचे दर्शन

Last Updated: Aug 13 2020 5:27PM
Responsive image


सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा - कास रस्त्यावरील शहरालगत असलेल्या यवतेश्वर घाटात बुधवारी (दि.१२) रात्री बिबट्याचे दर्शन झाले. रस्त्यापासून जवळ त्याचे दर्शन झाल्याने अनेकांची पाचावर धारण बसली. बिबट्या मुक्तपणे संचार करत असताना त्याचा स्थानिक ग्रामस्थांनी व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी बिबट्या दर्शनाची यवतेश्वरसह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.