Sat, Jul 04, 2020 01:25होमपेज › Satara › करंजे येथील अनाधिकृत बांधकाम तीस दिवसांत हटवण्याचे आदेश (video)

करंजे येथील अनाधिकृत बांधकाम तीस दिवसांत हटवण्याचे आदेश (video)

Last Updated: Nov 18 2019 7:31PM
सातारा : प्रतिनिधी

करंजे येथील सी.स.नं. ८५ मधील जमीन स्मशानभुमी व दफनभुमीसाठी दिली असताना त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे धार्मिक स्थळाचे अनाधिकृत बांधकाम सुरू असल्याबाबत सोमवारी पुन्हा एकदा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांची भेट घेवून नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी संबंधितांना पालिका प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना ३० दिवसात बांधकाम हटवण्याचेही आदेश दिले आहेत.

करंजे येथील जागा सातारा नगरपालिकेने स्मशानभुमी व दफनभुमीसाठी दिली आहे. मात्र त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे धार्मिक स्थळांचे बांधकाम सुरू असून, इतर धार्मिक विधी पार पाडले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना यापुर्वी निवेदन दिले होते. मात्र या निवेदनावर नगरपालिका प्रशासनाने काय कार्यवाही केली याची विचारणा करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी सोमवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी कदम यांनी संबंधिताना पालिका प्रशासनामार्फत अनाधिकृत बांधकाम हटविण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम ३० दिवसांच्या आत हटविण्यात यावे, असेही नोटीसात म्हंटले आहे. मात्र नागरिकांनी नगराध्यक्षांची चर्चा केल्यानंतर दि.७ डिसेंबर पर्यंत कार्यवाही न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.