Sun, Jan 17, 2021 05:23होमपेज › Satara › कराडः अपघातग्रस्त कारवर चोरट्यांचा डल्ला 

कराडः अपघातग्रस्त कारवर चोरट्यांचा डल्ला 

Published On: Dec 03 2017 2:07PM | Last Updated: Dec 03 2017 2:07PM

बुकमार्क करा

कराडः प्रतिनिधी 

वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत शनिवारी रात्री कारचा अपघात झाला. या अपघातातीला कारवर चोरट्यांनी डल्ला मारला असून पाठीमागील टायरासह, दोन बँगा, टेप, साहित्य व महत्त्वाची कागदपत्रांची चोरी झाली आहे. अपघाताची माहिती तळबीड पोलीस व महामार्ग गस्त पथकाला देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

काल रात्री स्विप्ट कार (क्र. Mh. 10. Ca,5986)  मधून  सागंली जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इम्रान बागवान सह आणखी तीन कार्यकर्ते पाचगणीवरून मिरजकडे निघाले होते. रात्री दोन वाजता वहागाव गावच्या हद्दीत आल्यानंतर अचानक त्यांच्या काराला पाठीमागुन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गावरून सरळ सेवा रस्तावर पलटी झाली. अपघाताची माहीती प्रथम रूग्णवाहिकेस मिळाली. रुग्णवाहिकेने घटनास्थाळी धाव घेत महामार्ग देखभाल दुरुस्तीच्या रात्रपाळी कर्मचारी अमित पवार यांच्याशी सपंर्क साधत सदर आपघाताची माहीती दिली व जखमींना घेऊन गेले. 

त्याचवेळी टोलनाक्याजवळ टँक्टरचा व टेम्पोंचा दुसरा अपघात झाला होता. त्यावेळी तळबीड पोलीस , महामार्ग गस्त पथक, टोलनाक्याजवळच्या अपघात ठिकाणावर येऊन गेले होते. टोलनाक्याजवळ अपघातातीला टेंम्पो मोठा असल्याने लहान क्रेनला टेंम्पो निघत नसल्यामुळे त्यांनी सदरची क्रेन घेऊन वहागाव येथील कार अपघाताकडे धाव घेतली.