Sun, Jul 05, 2020 16:19होमपेज › Satara › परराज्यातील नागरिकांनाही मान्याचीवाडीचे आकर्षण

परराज्यातील नागरिकांनाही मान्याचीवाडीचे आकर्षण

Published On: Oct 02 2018 1:18AM | Last Updated: Oct 01 2018 7:45PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

2001 या स्थापना वर्षापासून नेत्रदीपक कामगिरी साधणार्‍या आणि  स्वच्छ सातारा जिल्हा असा बहुमान  मिळविण्यात आपला मोलाचा वाटा उचलून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकणार्‍या मान्याचीवाडी ता. पाटण पाहण्यासाठी परराज्यातील  लोकांनाही आकर्षण वाटते. 

मान्याचीवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा 2001 साली मिळाला आणि पहिला सरपंच होण्याचा मान शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण करीत असलेल्या तात्यासाहेब माने या आदर्श शिक्षकाला मिळाला. त्यावेळी  साठच्या आसपास कुटूंब संख्या आणि साडे तिनशे ते चारशेच्या आसपास लोकसंख्या असलेली ही पंचायत शासनाच्या विविध योजना आणून प्रभावी राबविण्यात आणि प्रगतीचा वेग वाढविण्यात धडपडत असतानाच राज्य शासनाने जाहिर केलेल्या श्रीसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात उतरली आणि तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पहिल्याच स्पर्धेत पटकावला. मात्र तो बहुमान ही विकासाचे चाक ठरला आणि आणि मान्याचीवाडीने तेंव्हापासून आज 2018 पर्यंत मागे वळून पाहिलेच नाही यशाची घोडदौड अजूनही सुरूच आहे आणि प्रतिवर्षी त्याचा वेग वाढतच आहे. मान्याचीवाडीने 2005—06 साली पहिल्यांदा  केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार पटकावला,2007 —08 ला तंटामुक्त ग्राम अभियानाचा पुरस्कार,आणि त्यानंतर प्रतिवर्षी राष्ट्रीय, राज्य,विभागिय व जिल्हा किंवा तालुका स्तरावर पंचायत सबलीकरण, यशवंत पंचायत राज,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता, गौरव ग्रामसभा,पर्यावरण ग्रामसमृद्ध, आबासाहेब खेडकर पर्यावरण विकासरतक्,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी, सानेगुरुजी स्वच्छ प्राथ.शाळा,जिजाऊ कुपोषण मुक्त अंगणवाडी, ओ.डी.एफ.ग्रामपंचायत, अशा कुठल्याना कुठल्या 30 वर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे त्यातुन कोट्यवधी रूपयांचा निधी बक्षिसाच्या रूपाने मिळविला तर कोट्यावधीची विकासकामे करुन सर्वांगिण व चौफेर विकास साधला आहे.

आतापर्यंत या गावाने पाणी अडवा पाणी जिरवा योजना स्वखर्चाने राबवून पाणी समस्येवर मात केली आहे.एकेकाळी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या मान्याचीवाडीला आता 247 योजना कार्यान्वित असून मुबलक पाणीपुरवठा होतो. आय.एसओ.9001/2008 मानांकित ग्रामपंचायत, वाय.फाय युक्त,आणि सी.सी.टी.व्ही कॅमेरे,आर.ओ.वाटर फिल्टर योजना,बंदिस्त गटर योजना, नांदेड पँटर्न डासमुक्त योजना, संगणकीकृत, पर्यावरण संतुलीत ग्राम आणि आँक्सिजन युक्त गांव,बेटी बचाव बेटी पढाव योजना, प्रत्येक कुटूंब सौर उर्जायुक्त राज्यातले पहिले गांव, सौर पथदिवे,अ‍ॅानलाईन ग्रामसभा,अशा अनेक विविध व लोक सहभागातून राबविलेल्या योजना अशी एक ना अनेक वैशिष्टयपूर्ण  कारभाराने राज्यात आदर्श निर्माण करणारी ही ग्रामपंचायत प्रत्येक नागरिकाच्या आदर्श व सक्रिय सहभागातून आदर्श निर्माण केलेली आदर्श  ग्रामपंचायत आहे.