सातारा जिल्ह्यात आणखी ५१ पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 10 2020 1:40AM
Responsive image


सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे थैमान सुरू असताना गुरुवारी रात्री उशिरा आणखी 51 बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 हजार 543 झाली आहे. सातारा शहरातही कोरोना फैलावला असून गुरुवारी रात्रीपर्यंत बाधितांची संख्या 56 झाली होती. जिहे येथे बुधवारी रात्री 16 पॉझिटिव्ह सापडले होते. दरम्यान, गुरुवारी नव्याने 523 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांच्या रिपोर्टची धास्ती लागून राहिली तर  48 जणांनी कोरोनावर यशस्वी मातही केली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्हा दीड हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. गुरुवारी रात्री आणखी 

51  पॉझिटिव्ह आढळून आले.  

बुधवारी रात्री उशिरा आलेल्या 67 बाधितांमध्ये सातारा तालुक्यात अक्षरश: कहर झाला. या तालुक्यातील तब्बल 29 जण पॉझिटिव्ह आले असून  त्यामध्ये जिहे येथील बाधितांचा आकडा 16 होता. एकाच गावात एवढ्या मोठ्या संख्येने बाधित आढळल्याने तालुका हादरला. जिहेमध्ये यापूर्वी एकाच दिवसात 19 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा 16 बाधित आल्याने आख्खं गाव हादरून गेलं. या गावातील बाधितांची संख्या 45 वर पोहोचली. सातारा शहरातही बाधित झपाट्याने वाढल्याचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले. शहरातील बाधितांची संख्या 56 झाली आहे. सातारा तालुक्यात बुधवारी रात्री रविवार पेठ सातारा येथील 6, धावली येथील 1, सैदापूर 1, चोरगेवाडी 1, संगमनगर 1, जिहे येथील 16, व्यकटपूरा 1, भरतगाववाडी येथील 1, मल्हारपेठ 1 असे 29 पॉझिटिव्ह आढळले. शहरातील 8 जण  पॉझिटिव्ह आले. सातार्‍यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या जिल्हा प्रशासनासाठीही  डोकेदुखी ठरू लागली आहे. 

याशिवाय बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील बनवडी येथील 7, मलकापूर येथील 1 असे आठ बाधित आढळले. वाई तालुक्यातील पसरणी येथे 2, ब्राम्हणशाहीत 1, बदेवाडी येथील 1, शिरगाव येथील 1 असे 5 पॉझिटिव्ह आले. 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पवारआळीत 1, शिवाजी कॉलनी 1, तारांगण पळशी रोड, शिरवळ येथील 1, शिर्के कॉलनी 2, खोलारे आळी 1, शिरवळ येथील 4, न्यू कॉलनी 2, पाडेगाव, लोणंद येथील 2, चोपनवस्ती, लोणंद येथील 1, खेड येथील 1 असे 16 जणांना लागण झाली. 

खटाव तालुक्यातील मालनवाडा, वडूज 1, निमसोड येथील 1 असे 2 बाधित आढळले. पाटण तालुक्यातील कासनी येथे 1, कोरेगाव तालुक्यातील एकसळ येथील 1, चिलेवाडी भाडळी येथील 1, साप येथील 1, वाठार किरोली येथील 1 तर शिरवळ येथील 1 अशा एकूण 67 जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. गुरुवारी 48 जणांना आरोग्य यंत्रणेने टाळ्यांच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन डिस्चार्ज दिला आहे.