Mon, Nov 30, 2020 12:37होमपेज › Satara › मर्डरनंतर संपली कुटुंबाची वंशावळ

मर्डरनंतर संपली कुटुंबाची वंशावळ

Last Updated: Nov 22 2020 11:11PM

संग्रहित फोटोसातारा : विठ्ठल हेंद्रे

खेड, सातारामध्ये शनिवारी रात्री जन्मदात्या बापाने मुलाचा खून केल्यानंतर त्यांची वंशावळच संपल्याचे समोर आले आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे मृत गणेश भंडारे याच्या आई व पत्नी अशाप्रकारे तिघांचा 9 महिन्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी घराची पाहणी केली असता घरात मृत झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोंची रांग लागली होती.

श्रीधर भंडारे यांचे वय सध्या 72 आहे. ते रयत शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचा सेवाकाल संपल्याने निवृत्त झाले आहेत. पत्नी व दोन मुलांसोबत त्यांचा संसार सुरु होता. दोन्ही मुलांची लग्‍ने झालेली. दुर्देवाने भंडारे कुटुंबियांना गेल्या काही वर्षांपासून जणू दृष्ट लागली व टप्प्याटप्याने कुटुंबातील व्यक्‍तींचा मृत्यू होवू लागला. याबाबतची परिसरात चर्चा होती. सुमारे 10 वर्षांपूर्वी श्रीधर भंडारे यांचा धाकटा मुलगा सचिन भंडारे यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. ते आरोग्य विभागात कार्यरत होते. सचिन यांच्या मृत्यूने भंडारे कुटुंबिय पहिल्यांदा खचले. सचिन स्वभावाने चांगला होता. या घटनेनंतर गेल्या काही वर्षापासून दुसरा मुलगा गणेश याला व्यसन लागले. त्या व्यसनात तो पुर्णत: वाहत गेला. अशातच फेब्रुवारीमध्ये व नुकतेच एक महिन्यांपूर्वी गणेेशची आई व त्याची पत्नी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सचिन व गणेश या दोघांना अपत्य नव्हते. बाप-लेक दोघेच राहिले असतानाच आता लेकाचा मर्डर झाल्याने या कुटुंबातील बाप श्रीधर भंडारे एकटाच राहिला आहे.  सासू, सुनेच्या लागोपाठ मृत्यूमुळे भंडारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बाप- लेकामध्ये वारंवार वादावादी, भांडणे सुरु होती. शनिवारी रात्री देखील श्रीधर भंडारे गणेश याला मारहाण करताना जोरजोरात ओरडत होते की ‘तू पैसे चोरतोस, मला मारतोस. आई तुझ्यामुळेच गेली. आज तुला खलास करतो.’ हा घटनाक्रम परिसरातील नागरिकांनी ऐकला आहे. दरम्यान, नैराश्य, व्यसन यातूनच भंडारे कुटुंबियाची ‘ट्रॅजेडी’ झाल्याचे समोर आले आहे.