Wed, Jul 08, 2020 03:28होमपेज › Satara › जगताना त्यांनी मरण सोसलं

जगताना त्यांनी मरण सोसलं

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 8:51PM

बुकमार्क करा

रेठरे बु : दिलीप धर्मे

एड्स या महाभयंकर स्वतःच्या जीवनाबरोबर अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याचे दिसून येत आहे. यात कुटुंबाचा आधारस्तंभ तर गेलाच शिवाय एडसग्रस्त झालेली बायको व मुलगी अक्षरश: जगताना मरण सोसत आहेत. रोजच औषध खाऊन जगण्यासाठी संघर्ष करत समाजाकडून होणारी अवहेलना झेलत आहेत. तंत्रज्ञानाच्या दुनियेत आधुनिक विचारसरणी जोपासणार्‍या समाजाने एडसग्रस्तांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे. 

गेल्या आठ ते दहा वर्षात एचआयव्हीअर्थात एड्स या रोगाने संपुर्ण जगाची डोकी दुःखी वाढवली होती. आज या रोगाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारी औषधे, मार्गदर्शन, सल्ला यामुळे यामध्ये बर्‍यापैकी फरक पडत आहे. परंतु आजही पतीने पूर्वी केलेली चूक त्याच्या कुटुंबाच्या जीवावर बेतल्याचे वास्तव समोर आले आहे. कमवता तर गेलाच शिवाय बायकोसह मुलांनाही त्यानं जिवंतपणी मरण यातना दिल्याचे पाहून अनेकांचे मन हेलावल्या शिवाय राहावत नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा संसार सुरू होता.

लग्नानंतर काही दिवसात मुलीच्या रूपानं घरात लक्ष्मीचे पाऊले पडल्याचा आनंद त्यांच्या जीवनात काही औरच होता. परंतु हा आनंद काही औटघटकेचा होता हेच दिसून आले.काही दिवसातच पतीला एचआयव्हीची लागण झाल्याचे दिसून आले आणि  बिचार्‍या पत्नीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले.थोड्याच दिवसात पती कायमचा सोडून निघून गेला. पण त्यानं स्वतःच्या बायकोसह कोवळ्या मुलीलाही एड्चे शिकार केलं होतं. आज या माय, लेकी या रोगापासून वाचण्यासाठी रोजच औषधे खाऊन जगत आहेत. शाळेत जाणारी बिचारी मुलगी अनेक वेळा असल्या गोळ्याबद्दल आईला विचारत असते पण निःशब्द आईचं ओठ नेहमीच शिवलेलं आणि मन दबलेलं पाहून मुलगी मात्र गप्पच होते.

एकीकडे शाररीक यातना तर दुसरीकडे समाजाच्या नजरेतून वाचण्यासाठी  बिचार्‍या माय लेकी चार भितींच्या आत स्वतःचं आयुष्य व्यतित करत आहेत.त्यांना गरज आहे समाजाच्या पाठीब्याची आणि साहनभुतीची. अशी अनेक कुटुंबे मरण सोसत जगत आहेत. समाजाने अशा व्यक्तिंना मदत करणे गरजेचे आहे.