Wed, Sep 23, 2020 20:47होमपेज › Satara › उदयनराजेंसह 9 उमेदवारांंचे भवितव्य मशीनमध्ये बंद : अपवाद वगळता शांततेत मतदान 

जिल्ह्यात ६० टक्के मतदान

Published On: Apr 24 2019 1:41AM | Last Updated: Apr 24 2019 1:41AM
सातारा : प्रतिनिधी 

सातारा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 टक्के मतदान झाले. मतदानाची अधिकृत टक्केवारी बुधवारी जाहीर केली जाणार आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासह 9 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीन बंद झाले आहे. 

सातारा लोकसभा मतदार संघात  महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, अपक्ष शैलेंद्र वीर, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे,  बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप,  अपक्ष  सागर भिसे, अभिजीत बिचुकले, हे 9 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.  त्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 296 मतदान केंद्रांवर 9 लाख 35 हजार 878 पुरुष 9 लाख 3 हजार 92  महिला असे मिळून 18 लाख 38 हजार 987  मतदारापैंकी  सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 5 लाख 12 हजार 709 पुरुष, 4 लाख 62 हजार 162 महिला अशा 9 लाख 74 हजार 875 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.  सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी 53.01 टक्के मतदान झाले होते. प्राथमिक महितीनुसार हा आकडा सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढला. तो 60 टक्केपर्यंत गेला.  रात्री उशीरा संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर टक्का आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

विधानसभा मतदारसंघ निहाय  सायंकाळी 5 वाजेपर्यंत हाती आलेल्या मतदानाची  सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे सातारा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 68 हजार 197 पुरूष व 1 लाख 66 हजार 400 महिला असे मिळून 3 लाख 34 हजार 606  मतदारापैकी  87 हजार 915 पुरुष, स्त्रिया 80 हजार 587 असे 1 लाख 68 हजार 503  मतदारांनी हक्‍क बजावला. मतदारसंघात 50.36 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 51. 71 टक्के मतदान झाले होते. वाई विधानसभा मतदारसंघात1लाख 66 हजार 758 पुरूष व 1 लाख 63 हजार 361 महिला असे मिळून 3 लाख 30 हजार 123  मतदारापैकी 90 हजार 667 पुरूष 78 हजार 047   महिला असे मिळून 1 लाख 68 हजार 717  मतदारांनी मतदानाचा हक्‍क  बजावला.  सरासरी 51. 11 टक्के मतदान झाले. गत निवडणुकीत 46.21 टक्के मतदान झाले होते.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 52  हजार 748 पुरूष व 1लाख 44 हजार 49 महिला असे मिळून 2 लाख 96 हजार 797  मतदारांपैकी  86 हजार 612  पुरूष 74 हजार 573 महिला असे मिळून 1 लाख 61 हजार 185 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला सरासरी 54.31 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 48 टक्के मतदान झाले होते. कराड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 48 हजार 778 पुरूष व 1लाख 41 हजार 944  महिला असे मिळून 2 लाख 90 हजार 723 मतदारापैंकी 87 हजार 19 पुरूष, 77 हजार 208 महिला असे मिळून 1 लाख 64 हजार 227 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला सरासरी 56.49 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 49.77 टक्के मतदान झाले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 49 हजार 091 पुरूष व 1 लाख 39 हजार 864 महिला असे मिळून 2 लाख 88 हजार 957   मतदारापैकी  86 हजार 825 पुरूष, 75 हजार 633 महिला असे मिळून 1 लाख 62 हजार 458 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. सरासरी 56.22 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 53.50 टक्के मतदान झाले. पाटण विधानसभा मतदारसंघात1लाख 50 हजार 306 पुरूष व 1 लाख 47 हजार 474 महिला असे मिळून 2 लाख 97 हजार 781 मतदारापैकी 73 हजार 671  पुरूष, 76 हजार 114 महिला असे मिळून 1 लाख 49 हजार 785 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला सरासरी 50.30 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 53. 24 टक्के मतदान झाले होते.  सातारा लोकसभा मतदारसंघातील 9 लाख 35 हजार 878 पुरुष मतदारांपैकी 5 लाख 12 हजार 709 मतदारांनी तर 9 लाख 3 हजार 92 महिला मतदारांपैकी 4 लाख 62 हजार 162 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. सरासरी 60 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत सरासरी 53. 24 टक्के मतदान झाले होते.

मतदान केंद्रावर प्रमुख पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी मतदान यंत्राचे पूजन करून सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात केली. बहुतांश ठिकाणी    सुरूवातीपासूनच मतदारांत उत्साह दिसून येत होता. गटागटाने व घोळक्याने मतदार येताना दिसत होते. प्रमुख पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यार्ंचे मतदारांना  घरातून बाहेर काढण्यात आग्रही असल्याचे दिसत होते.  कडक उन्हाळा असल्याने बहुतांश ठिकाणी सकाळीच मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी 12 नंतर उन्हाची तीव्रता वाढू लागल्यावर मतदारांचा मतदान केंद्राकडे येण्याचा कल कमी होता.मात्र दुपारी 3 च्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली होती. सकाळी व सायंकाळी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर अपंग वयस्कर अंध व्यक्‍तींनीही मतदान करण्यासाठी हजेरी लावली. यावेळी अंध व्यक्‍तींना मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी प्रशासनाने ब्रेल लिपीतील मतप्रत्रिकांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अपंग व्यक्‍तीसाठी वाहना तसेच मतदान केंद्रावर रॅम्पसह विविध आठ सुविधा पुरवल्या होत्या.आत्तापर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रात घेऊन व मतदान झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.  युपीएससी परीक्षेत  यश मिळवलेल्या स्नेहल नाना धायगुडे यांनीही बोरी (ता. खंडाळा) येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले. तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटीक खेळाडू चैत्राली गुजर या युवतीने सातारा विधानसभा मतदार संघातील 306 मतदान केंद्रात जावून मतदान केले. सातारा विधानसभा मतदार संघात शाहुपूरी येथे सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रांवर महिलांनी उत्साहाच्या वातावरणात मतदान केले. वाई मतदारसंघात नायगाव ता. खंडाळा या सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचे स्वागत करुन त्यांना मतदान कक्षेत प्रवेश देण्यात आला. सतराव्या  लोकसभा निवडणुकीत युवा मतदारांनी प्रथमच मतदान केल्याने त्यांच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्साह दिसून येत होता. सकाळपासून या युवा मतदारांची निवडणूक केंद्रावर रेलचेल दिसत होती. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील संवेदशील (क्रिटीकल) 33 मतदान केंद्रावर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. जिल्हा प्रशासनाने 301 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून या मतदान केंद्रावर अधिकार्‍यांचा ‘वॉच’ होता. मतदार स्वीप कार्यक्रमातून करण्यात आलेल्या जागृतीमुळे  अपवाद वगळता प्रत्येक मतदारसंघात यावर्षी मतदानाचा टक्‍का वाढल्याचे चित्र पहायला मिळाले. 

आता प्रतीक्षा 23 मेच्या गुलालाची

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक चांगलीच गाजली. तेवढ्याच चुरशीने मंगळवारी मतदानही झाले. मात्र, मतदारांना 23 मे रोजी निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. निकालासाठी महिन्याचा कालावधी बाकी असल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोणाच्या खांद्यावर पडणार, याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.