Sun, Sep 20, 2020 04:32होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात 27 मृत्यू  913 पॉझिटिव्ह 

सातारा जिल्ह्यात 27 मृत्यू  913 पॉझिटिव्ह 

Last Updated: Sep 17 2020 2:14AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालांनुसार जिल्ह्यात आणखी 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा 752 झाला आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 913 पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 27,361 झाला आहे. तर, दुसरीकडे 583 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.  

मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार वाई तालुक्यातील विरमाडे येथील 59 वर्षीय पुरुष, वाई शहरातील 77 व 55 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे येथील 71 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 85 वर्षीय पुरुष अशा 5 जणांचा मृत्यू झाला. सातारा तालुक्यातील सातारा शहरातील 43 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे पेठ येथील 53 वर्षीय महिला, सोनगाव येथील 75 वर्षीय महिला, गोडोली येथील 68 व 85 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 51 वर्षीय पुरुष, शाहूपुरी येथील 84 वर्षीय पुरुष, शाहूनगर येथील 60 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 80 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 63 वर्षीय पुरुष अशा 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.    

कोरेगाव तालुक्यातील अंबवडे येथील 75 वर्षीय पुरूष, कठापूर येथील 80 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शेरेवाडी कुमठे येथील 75 वर्षीय पुरुष अशा 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. फलटण तालुक्यातील फलटण शहरातील 56 वर्षीय पुरूष, सोमवार पेठेतील 35 वर्षीय पुरूष, जिंती येथील 66 वर्षीय पुरूष अशा तिघांचा बळी गेला आहे. जावली तालुक्यातील काटवली येथील 72 वर्षीय महिला, सायगाव येथील 50 वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर खटाव तालुक्यातील पुसेगावमधील एका 75 वर्षीय बाधित महिलेचाही बळी गेला आहे. 

याचबरोबर कराड तालुक्यात 233, सातारा तालुक्यात 179, फलटण तालुक्यात 51, पाटण तालुक्यात 23, खंडाळा तालुक्यात  55, खटाव तालुक्यात 24, माण तालुक्यात 22,  कोरेगाव तालुक्यात 36, वाई तालुक्यात 47, जावली तालुक्यात 5, महाबळेश्‍वर 2, बाहेरील जिल्ह्यातील 9 व इतर 10 पॉझिटिव्ह आले आहे.

 "