Mon, Jan 20, 2020 16:37होमपेज › Sangli › आज इस्लामपूरमध्ये हळदी-कंकू समारंभ 

आज इस्लामपूरमध्ये हळदी-कंकू समारंभ 

Last Updated: Jan 16 2020 1:54AM
इस्लामपूर : प्रतिनिधी 
कस्तुरी क्‍लब आणि जायंट्स संस्कृती सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी मकर संक्रमण हळदी- कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा समारंभ आज दुपारी 3.00 वाजता जायंटस् हॉल उर्दू हायस्कूलसमोर, इस्लामपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना जायंट्स संस्कृती सहेली यांच्यावतीने प्रत्येक महिलांना हळदी-कंकू वाण देण्यात येणार आहे.

तसेच गेली तीन दिवस चालू असलेल्या डिजिटल कार्यशाळे मधील सहभागी महिलांमध्ये डिजिटल वुमन स्पर्धा होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सुपर डिजिटल वुमन म्हणून सन्मानित केले जाणार असून कार्यशाळेत उपस्थित महिलांमधून लकी डॉ. काढण्यात येणार आहे. अधिक महितीसाठी संपर्क - मंगल देसावळे 8830604322 व सारिका पाटील- 9975867151.