होमपेज › Sangli › सांगली लोकसभा लढणार : गोपीचंद पडळकर (video)

सांगली लोकसभा लढणार : गोपीचंद पडळकर (video)

Published On: Mar 18 2019 5:11PM | Last Updated: Mar 18 2019 5:12PM
विटा : प्रतिनिधी

धनगर समाजाचे युवा नेते आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले . कोणताही पक्ष असु देत अगर नसू देत परंतु आता मागे हटणार नाही. माझी लायकी काढणार्‍यांना त्यांची जागा दाखवणार असल्याची घणाघाती टीका गोपीचंद पडळकर विरोधकांवर केली. विट्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेससह इतर पक्षांच्या संपर्कात आहे परंतु भाजपकडे तिकीट मागितले नाही मला कोणाच्याही वरदहस्ताची गरज नाही. तरीही माझी लायकी काढणाऱ्यांना माझी ताकद दाखवून देण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे पडळकर म्हणाले. भाजपचे उमेदवार संजय पाटील असोत अगर नसोत मी माझी ताकद दाखवून देणारच प्रसंगी अपक्ष लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सुद्धा माझे चांगले संबंध आहेत. अनेक वेळा त्यांच्यात आणि माझ्यात चर्चा होत असतात. आरक्षणासंदर्भात या लोकांनी मला मोलाची साथ दिली आहे. मात्र जे मिळते ते घ्यायचं आणि ते मिळत नाही त्यासाठी पुन्हा चळवळीच्या माध्यमातून लढत राहणार असल्याचे ते म्हणाले.

मी भाजपकडे उमेदवारीसाठी तिकीट मागितले नाही. परंतु काँग्रेस बरोबर माझी चर्चा सुरू आहे मला इतर कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर ठिक नाहीतर माझं मी स्वतंत्रपणे निवडणुकीत उभा राहणार असल्याचे पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.