होमपेज › Sangli › ईडी, आयकर, सीबीआय हे मोदी, शहांचे कार्यकर्ते

ईडी, आयकर, सीबीआय हे मोदी, शहांचे कार्यकर्ते

Published On: Sep 29 2019 1:16AM | Last Updated: Sep 29 2019 1:29AM
सांगली : प्रतिनिधी

सत्तेचा गैरवापर करून भाजप विरोधकांवर राजकीय सूड उगवत आहे. काहीही संबंध नसलेल्यांनाही जबाबदार धरले जात आहे. ईडी, आयकर, सीबीआय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे कायकर्ते बनले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे नेते महेश खराडे व पदाधिकारी उपस्थित होते. 

शेट्टी म्हणाले, राज्य बँकेने कर्ज दिलेल्यांना दोषी धरले जात आहे; पण कर्ज घेऊन ते बुडविणार्‍यांवर काहीच कारवाई होत नाही. कारण ते सर्वजण भाजपमध्ये गेले आहेत. शेट्टी म्हणाले, ‘एनसीडीसी’च्या कर्जासाठी विनय कोरे, पंकजा मुंडे, महाडिक, कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांना राज्य शासनाच्या हमीवर कर्जाचा निर्णय झाला आहे. मी निश्‍चितपणे सांगतो की, हे कर्ज वसूल होणार नाही.

प्रा. जालिंदर पाटील हंगामी प्रदेशाध्यक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीपर्यंत हंगामी प्रदेशाध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील आणि सांगली जिल्हाध्यक्षपदी पोपट मोरे काम करतील. त्यांच्या निवडीची घोषणा शेट्टी यांनी केली.

प्रकाश आवाडे यांच्याशी संबंध तुटला

प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आम्ही आघाडीत असल्याने आता त्यांचा आणि आमचा संबंध तुटला आहे, असे शेट्टी यांनी  सांगितले.