Thu, Dec 03, 2020 06:57होमपेज › Sangli › तासगाव आगारातील २० चालक-वाहकांना कोरोना

तासगाव आगारातील २० चालक-वाहकांना कोरोना

Last Updated: Oct 27 2020 1:36AM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव बस आगारातील तब्बल ११ चालक आणि ९ वाहकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी ४३ चालक-वाहकांच्या अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यापैकी चालक-वाहक मिळून तब्बल २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १८ चालक-वाहकांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान एकाच दिवशी २० कर्मचा-यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वजण मुंबई येथे वाहतूक सेवेसाठी गेले असताना कोरोनाची बाधा झाल्याने चालक आणि वाचकांत घबराट पसरली आहे.

मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट च्या प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावणा-या चालक आणि वाहकांवर मोठा ताण आहे. तो कमी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातून प्रत्येकी दहा गाड्यासह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास पाठविण्यात आले होते. 

तासगाव आगारातील ४५ चालक-वाहक मुंबईत सेवेसाठी गेले होते. ते परत आल्यानंतर सोमवारी ग्रामीण रुग्णालयात ४३ चालक आणि वाहकांची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. यात २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आणि १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या प्रकाराने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे.