Wed, Aug 12, 2020 21:00होमपेज › Sangli › इस्लामपूरच्या शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलला प्रतिसाद

इस्लामपूरच्या शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलला प्रतिसाद

Published On: May 05 2018 1:37AM | Last Updated: May 05 2018 1:36AMइस्लामपूर : वार्ताहर

इस्लामपूरकरवासियांच्या प्रचंड प्रतिसादात...खवैय्यांच्या व ग्राहकांच्या गर्दीत  दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व प्रतिराज युथ फाऊंडेशनच्या ‘शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’ला शुक्रवारपासून येथे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.  लागीरं झालं जी मालिकेतील अजिंक्य व शितलच्या उपस्थितीनेेया फेस्टीव्हलची शोभा आणखीनच वाढली. पहिल्याच दिवशी या फेस्टीव्हलला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

तीन दिवस चालणार्‍या या फेस्टीव्हलचे उद्घाटन युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते  व झी टॉकीजवरील लागीरं झालं जी फेम अजिंक्य आणि शितल यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.  यावेळी प्रतिराज युथ फाऊंडेशनचे  संस्थापक, नगरसेवक खंडेराव जाधव, शाल्वी एंटरप्रायजेसचे नितीन पाटील, पंचवटी इंडस्ट्रीजचे भरतभाई पटेल, जय हनुमान पतसंस्थेचे संस्थापक, नगरसेेवक शहाजीबापू पाटील, दै. पुढारीचे वृत्तसंपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदी यावेळी उपस्थित होते. 

फेस्टीव्हलच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी चरचरीत, चटपटीत खाद्य पदार्थांबरोबरच शॉपिंगचाही आनंद लुटला. अजिंक्य व शितलला पाहण्यासाठी युवक-युवतींनी प्रचंड गर्दी केली होती. सेल्फीसाठीही एकच झुंबड उडाली होती. सायंकाळी 6 वाजल्यापासूनच खुल्या नाट्यगृहात नागरिकांची गर्दी होवू लागली होती. 

व्यासपीठावर नितीन कुलकर्णी व मंजुषा खेत्री यांच्या ‘हसतमुखी सदामुखी’ या कार्यक्रमाने उपस्थितांना खळखळून हसविले. स्थानिक कलाकारांनी नृत्य सादर केले.   
फेस्टीव्हलच्या उद्घाटनानंतर टोमॅटो एफएमचे बोल बच्चन (विश्‍वराज जोशी) यांनी अजिंक्य व शितल यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत दोघांनी लागीरं झालं जी  मालिकेची पार्श्‍वभूमी विषद केली. तसेच शुटींगदरम्यान सेटवर होणार्‍या गंमती-जंमतीही सांगितल्या. या मालिकेतील अनेक कलाकार इस्लामपुरातील असल्याने आमचे इस्लामपूरशी घट्ट नाते असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. 

या फेस्टीव्हलमध्ये 60 पेक्षा जास्त खाद्य पदार्थांचे व शॉपिंगचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, कडकनाथ कोंबडीची बिर्याणी, चायनीज, आईस्क्रीम, भडंग, आदी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तर शॉपिंगसाठी कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बेंन्टेक्सचे दागिने, चार चाकी कार आदींसह सर्व काही या फेस्टीव्हलमध्ये उपलब्ध आहे.