Sun, Oct 25, 2020 07:46होमपेज › Sangli › सांगलीत पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

सांगलीत पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

Last Updated: Aug 12 2020 1:07PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी (दि.१२) सकाळी ही घटना घडली. मृत पोलिस एक वर्षापूर्वी रत्नागिरी येथून बदली होऊन जिल्ह्यात आले होते. सध्या त्यांची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे नेमणूक होती. 

अधिक वाचा : कोरोनापुढे माणुसकीच्या भिंतीही ढासळल्या

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मिरजेतील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्हा पोलिस दलातील पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : ‘पाच हजार पार’; जिल्ह्यात नवे 130 पॉझिटिव्ह

 "