Sat, Oct 31, 2020 12:08होमपेज › Sangli › ...आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (VIDEO)

...आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (VIDEO)

Last Updated: Oct 18 2020 7:10PM

जयंत पाटीलसांगली : पुढारी ऑनलाईन 

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गेले होते. पण, मंत्री जयंत पाटील आपला खंदा कार्यकर्ता गेल्याने चांगलेच भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांबरोबरच्या जिव्हाळ्याच्या संबंधाची साक्ष देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणून जयंत पाटलांची ओळख आहे. त्यांच्या राजकराणाची एक उत्तम ओळख म्हणजे त्यांचे कट्टर कार्यकर्ते. अशाच चांगल्या वाईट काळात कायम साथ देणाऱ्या कार्यकर्त्याच्या जाण्याचे दुःख आज जयंत पाटील लपवू शकले नाहीत. आज ते कार्यक्रमात बोलत असताना अचानक शांत झाले. त्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.   

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र, तीच लोकं आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.

देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंत पाटील यांनी या काळात गमावले. 

 "