Tue, Jun 15, 2021 13:32होमपेज › Sangli › कस्तुरी क्लबची उद्या डिजिटल कार्यशाळा

कस्तुरी क्लबची उद्या डिजिटल कार्यशाळा

Last Updated: Jan 16 2020 1:54AM
इस्लामपूर : प्रतिनिधी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व मॉडर्न कॉम्प्युटर्स अ‍ॅण्ड शेफा टायपिंग इन्स्टिट्यूट आणि जायंटस् संस्कृती सहेली यांच्या  विद्यमाने  शनिवारी (दि. 11) रोजी डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन मॉडर्न कॉम्प्युटर्स येथे सकाळी 11 वाजता जायंटस् संस्कृती सहेलीच्या अध्यक्षा ज्योती माळी, नूतन अध्यक्षा स्मिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  चार दिवसांच्या कार्यशाळेत ई - मेल, सर्चिंग, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, महिलांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर,  वीजबिल, दूरध्वनी बिल, विमा हप्ते ऑनलाईन भरणे, नेट बँकिंग, बस, रेल्वे व विमान यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग, शासनाच्या विविध सेवा, कराओके गाणी, आरोग्याच्या काळजीसाठी, निरोगी राहण्यासाठी आवश्यक योग्य आहार, विविध अ‍ॅपचा वापर आदि  विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. सहभागी महिलांची डिजिटल ‘सुपर वुमन 2020’ ही कॉन्टेस्ट घेण्यात येणार आहे.  विजेत्यांना ‘डिजिटल सुपर वुमन 2020’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यासाठी दि. 11 पूर्वी नाव नोंदणी  आवश्यक आहे.  येताना  पेन, वही, मोबाईल आवश्यक आहे. महिलांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन कस्तुरी क्लबच्या संयोजिका मधू देसावळे यांनी केले आहे. संपर्क : मधू देसावळे - 8830604322, सारिका पाटील - 9975867151. 

दि. १४ रोजी हळदी-कुंकू आणि स्पर्धा
कस्तुरी क्लब आणि जायंटस् संस्कृती सहेली यांच्या वतीने दि. 14 रोजी सामुदायिक हळदी-कुंकू दुपारी 3 वाजता जायंटस् हॉल उर्दू हायस्कूलसमोर इस्लामपूर येथे होणार आहे. त्यानंतर डिजिटल वुमन स्पर्धा होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना ‘सुपर डिजिटल वुमन’ म्हणून सन्मानित केले जाणार आहे. 4 दिवसाच्या या कार्यशाळेत उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. हळदी-कुंकूसाठी जायंटस् संस्कृती सहेली यांच्यावतीने प्रत्येकाला वाण देण्यात येणार आहे.