Wed, Aug 12, 2020 13:16होमपेज › Sangli › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ‘जेलभरो’

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ‘जेलभरो’

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शुक्रवारी सामुहिक रजा काढून जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन केले. मागण्यांवर लेखी ठोस आश्‍वासनासाठी शासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम देत सोमवारपासून बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेवर तसेच दि. 21 पासून लेखी परीक्षेवर बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे. 

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे, सचिव प्रा. सुरेश भिसे, उपाध्यक्ष प्रा. एस. एस. पाटील, प्रा. पी. व्ही. जाधव, प्रा. दिलीप जाधव व संघटना पदाधिकार्‍यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

आंंदोलक शिक्षकांच्या मागण्या

दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर टप्पा अनुदान, दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना व शिक्षकांना त्वरित अनुदान द्यावे, सन 2012-13 पासूनच्या सेवानिवृत्ती व अन्य कारणाने रिक्‍त झालेल्या पायाभूत पदावरील शिक्षकांना नियुक्‍ती दिनांकापासून मान्यता व वेतन देणे, सन 2003 ते 2010-11 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्‍ती मान्यता देणे, या कालावधीत शिक्षण उपसंचालक स्तरावर वगळलेल्या नवीन वाढीव पदांना व सन 2011-12 पासूनच्या नवीन वाढीव पदांना तात्काळ मंजुरी देणे, उपप्राचार्य व पर्यवेक्षकांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करावी, घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन वाढवावे यासह 32 मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले.