Wed, Sep 23, 2020 08:35होमपेज › Sangli › 'हिंदूंनी राम मंदिर भूमीपूजनदिनी राष्ट्रीय उत्सव साजरा करावा' (video)

'हिंदूंनी राम मंदिर भूमीपूजनदिनी राष्ट्रीय उत्सव साजरा करावा' (video)

Last Updated: Aug 03 2020 2:54PM

संभाजी भिडेसांगली : पुढारी वृत्तसेवा

देशाला अतिप्राचीन संस्कृती आहे. प्रभू रामचंद्रांचे जीवन अतुलनीय आहे. अयोध्येत बुधवारी राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. या दिवशी देशातील सर्व हिंदूंनी दसरा, दिवाळीप्रमाणे आनंदोत्सव साजरा करावा. कोरोनाची भीती न बाळगता हिंदूंनी हा राष्ट्रीय उत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची पत्रकार परिषदेत केले.

भिडे म्हणाले, की मुस्लिमांनी देशावर आक्रमण केल्यानंतर पाचशे वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर पाडून मशीद बांधली होती. तेव्हापासून अयोध्येत राम मंदिर होण्यासाठी लढा सुरू आहे. आता दि. ५ ऑगस्ट रोजी मंदिराचे भूमीपूजन होत आहे. हा मांगल्याचा प्रसंग आहे. दसरा, दिवाळीप्रमाणे हा दिवस हिंदूंनी आतषबाजी करून साजरा करावा. या मंदिरात राम पंचायतनच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करताना पुरूष मुर्तींना मिशा असाव्यात. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली यातून सुधारावी अशी विनंती त्यांनी मंदिर निर्माणचे प्रमुख गोविंदगिरी महाराज यांना केली आहे.

छत्रपती शिवाजी महारांजांमुळेच देशातील हिंदुत्व अबाधित राहिले. त्यामुळे भूमिपूजनाआधी शिवप्रतिमेचे पूजन करावे अशी विनंतीही गोविंदगिरी महाराज यांना केल्याचे भिडे यांनी सांगितले. यामुळे कोरोनाशी लढताना आत्मप्रेरणा मिळेल. मंदिराच्या भूमीपूजनासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 32 किल्ल्यांवरील माती, रामशेज तलावाचे जल घेऊन शिवप्रतिष्ठानचे धारकरी अयोध्येला रवाना झाले आहेत. भूमिपूजनात त्याचा वापर करावा अशी विनंती गोविंदगिरी महाराज यांना केल्याचेही त्यांनी सांगितले.
 

 "