Fri, May 07, 2021 17:48
सांगलीत ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन, जयंत पाटील यांची माहिती

Last Updated: May 05 2021 2:24AM

जयंत पाटील
सांगली : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावला जात आहे. याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.  

वाचा : ब्रेक्रिंग : कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

''आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळत आहे, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल,'' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

वाचा : गोकुळच्या सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू; क्रॉस व्होटिंगमुळे धाकधूक वाढली

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.