Mon, Aug 10, 2020 07:42होमपेज › Sangli › सांगलीत घरात घुसून तरुणावर खुनी हल्ला

सांगलीत घरात घुसून तरुणावर खुनी हल्ला

Last Updated: Jul 13 2020 10:14AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली शहरातील १०० फुटी रस्ता परिसरातील रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे घरात घुसून एका तरुणावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक राजेंद्र गाडेकर (वय २२) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रतीक घरात झोपला होता. त्याचे वडील अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता. त्यावेळी दोन अज्ञात त्याच्या घरात घुसले. प्रतिकवर त्यांनी झोपेतच हल्ला केला. त्याच्या उजवा कान, डोके, कपाळावर जोरदार हल्ला करण्यात आला. त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

वाचा :अलमट्टी धरण महिन्यातच ७५ टक्के भरले