होमपेज › Sangli › सांगली: गणेश मंडळे विसर्जन मार्गांवर मार्गस्थ

सांगली: गणेश मंडळे विसर्जन मार्गांवर मार्गस्थ

Published On: Sep 12 2019 2:38PM | Last Updated: Sep 12 2019 9:04PM

मिरजेत विसर्जन मिरवणुकीस सुरुवात सांगली : प्रतिनिधी 

मिरजेत विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. शहरातींल 200 मंडळांचे आज विसर्जन होणार आहे. अनेक गणेश मंडळे विसर्जन मार्गांवर मार्गस्थ झाले आहेत. मिरजेतील गणेश तलाव तेथे लहान गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. सांगलीतील सरकारी घाटावर देखील सकाळपासून विसर्जनसाठी गर्दी झाली. 

मिरजेत मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन कृष्णाघाट येथे करण्यात येते. परंतु रेल्वे मार्गालगत रेल्वेने 13 फूट उंचीची ओव्हर हेड कमान उभी केली आहे. तसेच कृष्णाघाट पुलावरून विसर्जन करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावर्षी मिरजेतील उंच गणेश मूर्तींचे सांगलीतील बायपास पुलाजवळ विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मिरवणूक मागील वर्षी 32 तास चालली. मिरवणूक यावर्षी आणखी लांबण्याची शक्यता आहे. 

मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणुकीत 2 पोलिस उपाधीक्षक, 10 निरीक्षक, 25 उपनिरीक्षक यांच्यासह जलद कृती दल, केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.