होमपेज › Sangli › चोरीच्या बुलेट विकत घेणारी टोळी जेरबंद

चोरीच्या बुलेट विकत घेणारी टोळी जेरबंद

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:56AMमिरज : शहर प्रतिनिधी

चोरीच्या बुलेट मोटारसायकल विकणार्‍या आणि विकत घेणार्‍या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शुक्रवारी पाच नव्या बुलेट जप्त करण्यात आल्या. 
यामध्ये रोहित बाबासाहेब धेंडे (वय 20, रा. एरंडोली), प्रवीण राजाराम कांबळे (30, रा. सलगरे), प्रशांत महादेव हारगे (32, रा. सलगरे),  अतुल आप्पासाहेब कुंडले (23, रा. सलगरे), विठ्ठल मल्लाप्पा खोत (24, रा. चाबूकस्वारवाडी), प्रवीण उत्तम कांबळे (22, रा. मसुरगुप्पी, ता. अथणी, जि. बेळगाव), सतीश गजानन पाटील (रा. ज्योतिर्लिंग कॉलनी, पाचगाव रोड, कोल्हापूर) यांचा त्यात समावेश आहे. 

त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.   पोलिस  उपनिरीक्षक अभिजीत सावंत व त्यांच्या पथकानेे रोहित,  प्रवीण आणि  प्रशांत  या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता रोहित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मिरजेतील नव्या पाच बुलेट मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. त्या सर्व बुलेट त्यांनी एका टोळीला पन्नास हजार रूपयांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार अतुल  , विठ्ठल  आणि प्रवीण  कांबळे,  सतीश  यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच बुलेट जप्त करण्यात आल्या. त्यांनी प्रत्येक बुलेट पन्नास हजार रूपयांना विकत घेतल्याचे सांगितले. 

दोन महिन्यांत 35 दुचाकी जप्‍त...

शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी जून व जुलै या दोन महिन्यांत एकूण 35 दुचाकी जप्‍त केल्या आहेत.