Wed, Aug 12, 2020 09:35होमपेज › Sangli › स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा

स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 11:43PM
इस्लामपूर : वार्ताहर

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य मानवी हक्‍क आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी  सोमवारी मुंबई येथे मानवी हक्‍क आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी अनिकेत कोथळे यांच्या पत्नी संध्या कोथळे, सीआयडीचे अधिकारी व मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कोथळे याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा सहभाग असल्याने या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फ त चौकशी करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेने केली होती. 

या मागणीवर सोमवारी मुंबई येथे राज्य मानवी हक्‍क आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी ह्युमन राईट असोसिएशनचेे कार्याध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य मानवी हक्‍क आयोगामार्फत त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्यावर आयोगाने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. यावेळी  मानवाधिकार संघटनेचे प्रवक्‍ते रामदास खोत, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जावेद, सचिव हमीद पन्हाळकर आदी उपस्थित होते.