Mon, Nov 30, 2020 13:07होमपेज › Sangli › सांगली : कवठेमहांकाळ एसटी आगार व्यवस्थापकाला लाच घेताना अटक

सांगली : कवठेमहांकाळ एसटी आगार व्यवस्थापकाला लाच घेताना अटक

Last Updated: Oct 31 2020 2:13PM

संग्रहीत फाेटाेसांगली : पुढारी वृत्तसेवा

केवळ सहा महिने अल्प वेतनवाढ रोखण्याचा रिपोर्ट पाठवतो असे सांगून कर्मचार्‍यांकडून दहा हजारांची लाच घेताना कवठेमहांकाळ येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. स्वप्नील लालासाहेब पाटील (वय ३०, रा. कवठेमहांकाळ) असे आगाराच्या व्यवस्थापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.३१) रोजी सकाळी ही कारवाई केली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचा : पत्नीसोबतच्या शरीर संबंधांचे चित्रीकरण करून हुंड्यासाठी छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल!

कवठेमहांकाळ आगारातील एका कर्मचार्‍याची सांगलीतील विभागीय कार्यालयात चौकशी सुरू होती. त्या चौकशीत स्वप्नीत पाटील संबंधित कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्याबाबत रिपोर्ट पाठवणार होते. त्यांनी संबंधित कर्मचार्‍याला बोलावून घेतले. नंतर दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा रिपोर्ट पाठवत नाही. त्याऐवजी केवळ सहा महिने अल्प वेतनवाढ रोखण्याचा रिपोर्ट पाठवतो. असे स्वप्नीत पाटील याने कर्मचार्‍याला सांगितले. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडे दहा हजारांची लाच मागितली. यानंतर कर्मचाऱ्याने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सांगितली. यानंतर शनिवारी सकाळी स्वप्नीत पाटील याला कवठेमहांकाळ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानात दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

अधिक वाचा :'आईने माफी मागितली की नाही माहित नाही पण बाप म्हणून मी मुलाकडून माफी मागतो'

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.