Wed, Aug 12, 2020 09:27होमपेज › Sangli › स्वाभिमानी पाच जागा लढविणार

स्वाभिमानी पाच जागा लढविणार

Last Updated: Oct 08 2019 1:30AM
मिरज : भाजपचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांची महाआघाडी तयार झाली आहे. यामधून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील मिरज, शिरोळ, नंदूरबार, वरुड-बुरशी (जि. अमरावती) आणि खामगाव (जि. बुलढाणा) या पाच जगांवर निवडणूक लढवत आहे. असे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ते म्हणाले, महाआघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिरज विधानसभेची जागा सोडली आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून बाळासाहेब होनमोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा आम्ही ताकदीने लढवू असे सांगितले. शेट्टी म्हणाले, भाजप नेत्यांना पाच वर्षांच्या सत्तेच्या कालावधीतच मस्ती आली आहे.

ती मस्ती या निवडणुकीत जनताच जिरवेल. विरोधी पक्षनेत्यांबाबत बोलण्याची भाषाही बदलली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता जाऊन महाआघाडीची सत्ता येईल, असा विश्‍वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. यावेळी विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, आप्पासाहेब हुळ्ळे व अन्य उपस्थित होते.