इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर वाढीव घरगुती विज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी राज्य शासन व महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार रविंद्र सबनीस यांना देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड. एस. यू. संदे, भागवत जाधव, धर्यशील पाटील, रमेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्राचार्य विश्र्वास सायनाकर, धनाजी गुरव आदीसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.