Mon, Aug 10, 2020 05:20होमपेज › Sangli › देशमुख, पाटील यांची काँग्रेसच्या मुलाखतींकडे पाठ

देशमुख, पाटील यांची काँग्रेसच्या मुलाखतींकडे पाठ

Published On: Aug 03 2019 1:14AM | Last Updated: Aug 02 2019 11:04PM
सांगली : प्रतिनिधी 

विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेसने शुक्रवारी घेतल्या.  पण या मुलाखतीकडे शिराळ्याचे सत्यजीत देशमुख व खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पाठ फिरवली. 
जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम, जयश्री पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह 25 इच्छुकांनी साध्या पध्दतीने मुलाखती दिल्या. 
विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील इच्छुकांचे  अर्ज मागविले होते. अर्ज दाखल केलेल्यांच्या मुलाखती शुक्रवारी काँग्रेस कमिटीत झाल्या. राज्याच्या प्रभारी सोनल पटेल, जिल्हा निरीक्षक व प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, विश्वजीत कदम, चिटणीस अलका राठोड, जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्री पाटील, शैलजा पाटील, सोनम पटेल यांनी मुलाखती घेतल्या. 

शिराळा मतदारसंघासाठी प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मुलाखतीस ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू होती.  तसेच खानापूर-आटपाडीतून  सदाशिवराव पाटील  हे उमेदवारी मागणार असल्याची चचार्र् होती.   त्यांनी उमेदवारी मागितली देखील नाही. शिवाय मुलाखती घेण्यासाठीही  ते गैरहजर राहिले. देशमुख व पाटील या दोन वरिष्ठ नेत्यांच्या गैरहजेरीची वेगळीच चर्चा काँग्रेसमध्ये रंगली आहे.

मिरज मतदारसंघासाठी सर्वाधिक अकराजण इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाखती प्रथम घेण्यात आल्या. सांगलीसाठी जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. पृथ्वीराज पाटील यांनी विधानपरिषद, लोकसभा व महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात आक्रमक अशी आंदोलने केली आहेत. अनेक योजना व नागरी हिताची कामे केली असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. 

इस्लामपूर मतदारसंघात जितेंद्र पाटील, अजित ढोले, हंबीराव पाटील व नंदकुमार शेळके यांनी उमेदवारीची मागणी केली. जत मतदारसंघातून विक्रम सावंत यांनी उमेदवारी मागितली.  
खानापूर-आटपाडी मतदारसंघातून राजाराम देशमुख यांनी उमेदवारी मागितली. त्यांच्या समर्थकांनी  सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात तक्रारी केल्या. पक्षाने त्यांना यापूर्वी आमदारकी दिली आहे. मात्र त्यांना तालुक्यातील काँग्रेसची कार्यकारिणी माहिती नाही. ते आता उमेदवारीसाठी इच्छुक नाहीत. पक्षाने त्यांच्या पाठीमागे लागू नये. जे इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील 25 इच्छुकांनी उमेदवारी दिल्या. त्यांचा अहवाल तयार करून प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार आहे. 

या इच्छुकांनी दिल्या मुलाखती

मिरज :आनंद डावरे, सदाशिव खाडे, प्रा. सिध्देश्वर जाधव, सदाशिव वाघमारे, नामदेव कस्तुरे, नंदादेवी कोलप, अरूण धोत्रे, विनय कांबळे, धनराज सातपुते, हेमराज सातपुते, प्रतिक्षा सोनवणे, सांगली: पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, सुभाष खोत, संतोष पाटील, पलूस-कडेगाव: विश्वजीत कदम, जयसिंग थोरात, जत: विक्रम सावंत, चंद्रकांत सांगलीकर, खानापूर-आटपाडी: राजाराम देशमुख, तासगाव-कवठेमहांकाळ:अविराजे शिंदे, इस्लामपूर: जितेंद्र पाटील, अजित ढोले, हणमंत पाटील, नंदकुमार शेळके.

आणले बाऊन्सर 

एका इच्छुकाने  चार बाऊन्सर आणले होते. पक्षातील काही लोकांनी मारहाण केली असल्याची त्यांची तक्रार होती. या उमेदवाराने पक्षासाठी आंदोलन करताना गळ्याला एकदा फास लागल्याचा किस्सा पक्षश्रेष्ठींना सांगितला.