होमपेज › Sangli › सराफी दुकान, डेअरी फोडून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

सराफी दुकान, डेअरी फोडून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:05AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

वाळवा तालुक्यातील महादेववाडी येथे ज्वेलर्स दुकान व एका दूध डेअरीचे शटर्स उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्‍कम व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी प्रकाश मारुती पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

प्रकाश पाटील यांचे महादेववाडीत ग्रामपंचायतीच्या गाळ्यात ‘खंडोबा ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास गेले असता, त्यांना दुकानाचे शटर्स उचकटलेले आढळून आले. दुकानातील 35 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे मुगवट, 25 हजार रुपये किमतीच्या 1 किलो चांदीच्या मूर्ती व 9 हजार रुपये किमतीची चांदीची मोड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या दुकानालगतच असलेल्या अशोक बंडू यादव यांच्या अष्टविनायक दूध संकलन केंद्राचेही शटर उचकटून चोरट्यांनी दूध केंद्रातील 12 हजार रुपयांची रोकड लंपास केली.